महाराष्ट्रातील चौघांना सुधारक सेवा पदक जाहीर

0
81

स्वातंत्र्यदिनानिमित्त 36 तुरुंग अधिकाऱ्यांना सुधारक सेवा पदके प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. यात असामान्य सेवेसाठी राष्ट्रपती सुधारक सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवेसाठी 31 सुधारक सेवा पदकांचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील चौघांना उल्लेखनीय सेवेसाठी सुधारक सेवा पदके जाहीर झाली आहेत. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :- कलप्पा मलकप्पा कुंभार – सुभेदार, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कैलास शालिक बाऊस्कर हवालदार, मुंबई जिल्हा महिला कारागृह, संजय राजारामजी तलवारे शिपाई, नागपूर मध्यवर्ती कारागृह, राजू विठ्ठल हाटे शिपाई, नागपूर मध्यवर्ती कारागृह यावर्षी 59 कर्मचाऱ्यांना अग्नी सेवा पदक जाहीर झाली आहेत.

यापैकी एकाला राष्ट्रपती अग्नीसेवा शौर्य पदक, तिघांना अग्नीसेवा शोर्य पदक, पाच जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती अग्नीसेवा पदक आणि 50 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी अग्नीसेवा पदक जाहीर झाले आहेत. 55 कर्मचाऱ्यांना होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदके जाहीर झाली आहेत. यापैकी पाच कर्मचाऱ्यांना अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर 50 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठी होमगार्ड आणि नागरी सुरक्षा पदक जाहीर झाले आहेत.