महाराष्ट्राच्या सुनीत जाधवला “मि. एशिया’ किताब

0
438

52व्या आशियाई बॉडीबिल्डिंग अँड फिजिक स्पोर्टस चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने “मि. एशिया’ हा किताब पटकावला. तीनवेळचा “मि. इंडिया’ असलेल्या सुनीतचे आशियाई स्तरावरील हे पहिलेच विजेतेपद ठरले.

म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा रविवारी रात्री उशीरा संपली. या स्पर्धेत यजमान भारताने पुरूष शरीरसौष्ठव गटामध्ये 5 सुवर्ण, 6 रौप्य आणि 4 कांस्य अशी एकूण 15 पदके तर जिंकली, शिवाय या गटातील विजेतेपदही पटकावले.