महाराष्ट्राचा वीज निर्मितीमध्ये देशात सहावा क्रमांक 2016-17

0
12

2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली ; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा असून राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे.

वीजनिर्मितीत हिमाचल प्रदेश सध्या आघाडीवर असून त्याखालोखाल गुजरात, छत्तीसगड, पंजाब आणि हरियाणाचा क्रमांक लागतो. 2014-15 मध्ये राज्यात देशातील सर्वाधिक वीजनिर्मिती झाली ; परंतु दरडोई वीजनिर्मितीत राज्याचा क्रमांक सहावा असून राज्यात दिवसेंदिवस वीजनिर्मितीत वाढ होत आहे. 2016-17 मध्ये डिसेंबरपर्यंत राज्यात 82 हजार 441 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. एकूण वीजनिर्मितीत ‘महानिर्मिती’चा वाटा 41.9 टक्के असून, त्याखालोखाल अदानी पॉवर कंपनीचा वाटा. महाराष्ट्रात 2015-16 मध्ये एकूण वीजनिर्मितीत पूर्वीच्या वर्षापेक्षा 9.6 टक्के इतकी वाढ झाली असून, 1 लाख 13 हजार 787 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.

वीजनिर्मितीची वाढ (दशलक्ष युनिट)
स्रोत 2013-14 2014-15 2015-16 2016-17
राज्यामधील 91,987 1,03,779 1,13,787 82,441
औष्णिक 71,686 84,882 94,482 63,972
नैसर्गिक वायूजन्य 6,055 4,626 5,302 7,122
जलजन्य 6,763 5,856 5,045 4,196
नवीकरणीय 7,483 8,415 8,958 7,151
केंद्रीय क्षेत्रातून उपलब्ध 31,525 30,401 29,179 22,436

वीजनिर्मिती केंद्र 

 

रामगुंडम येथे दक्षिण भारतामधील सर्वात मोठे औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. 2600 मेगावॉट क्षमतेचे येथील एन.टी.पी.सी. केंद्र आय.एस.ओ. 14001 प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले वीजनिर्मिती केंद्र होते. येथे तयार होणारी वीज तेलंगणा, आंध्रप्रदेश, महराष्ट्र,, कर्नाटक, तामिळनाडू  व केरळ या 6 ज्यांना पुरवली जाते.