मलेशियाच्या कॅबिनेट मंत्रिपदी पहिल्यांदाच भारतीय

0
17

भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची मलेशियात नव्याने सत्तेवर आलेल्या सरकारमध्ये निवड झाली आहे. त्यांचे नाव गोविंद सिंग देव असे असून ते मलेशियातील अल्पसंख्याक समुदायातील मंत्री होणारे पहिलेच मंत्री आहेत.

४५ वर्षांचे देव हे असून कम्युनिकेशन आणि मल्टिमीडिया हे खाते त्यांच्याकडे देण्यात आले आहे. त्यांच्याबरोबरच नव्या सरकारमध्ये भारतीय वंशाच्या आणखी एका व्यक्तीची मंत्रिमंडळात निवड झाली आहे. एम. कुलसेहरन हे डेमोक्रॅटिक अॅक्शन पार्टीचे सदस्य असून त्यांच्याकडे मनुष्यबळ विकास मंत्रालय देण्यात आले आहे. पुचोंग मतदारसंघाचे गोविंद सिंग देव संसदेत प्रतिनिधित्त्व करतात. मलेशियात त्यांचे वडिल करपाल सिंग हे वकिल आणि राजकीय नेते होते. नॅशनल पॅलेस येथे देव यांना काल शपथ देण्यात आली.