भारत व पॅलेस्टाईन यांच्यात सहा करार

0
22

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पॅलेस्टाईन देशाच्या दौर्‍यादरम्यान राष्ट्रपती महमूद अब्बास यांच्यासोबत झालेल्या एका द्विपक्षीय बैठकीमध्ये दोन्ही देशांमधील संबंधांना चालना देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम आशिया आणि आखाती प्रदेशातील पॅलेस्टाईन, UAE आणि ओमान या देशांच्या दौर्‍यावर आहेत. बैठकीचे फलित म्हणून शेवटी, आरोग्य, शिक्षण अश्या सहा विविध क्षेत्रांमध्ये सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

भारत व पॅलेस्टाईन यांच्यातील करार :

# बेथलेहमच्या बेत सहौरमध्ये $30 लक्षच्या गुंतवणुकीतून एक भारत-पॅलेस्टाईन सुपर-स्पेशियलिटी रुग्णालयाची स्थापना

# महिलांच्या सशक्तिकरणासाठी $5 कोटीच्या गुंतवणुकीतून ‘तुराथी’ नामक भारत-पॅलेस्टाईन केंद्राची उभारणी

# $5 लक्षच्या गुंतवणुकीसह रमल्लामध्ये एक राष्ट्रीय प्रिंटिंग प्रेसची स्थापना

# अनुक्रमे $11 लक्ष आणि $10 लक्षच्या गुंतवणुकीसह तुबास प्रांताच्या तमनून आणि मुथालथ अल शौहादा गावांमध्ये दोन शाळांची उभारणी

# अबू दीस येथील जवाहर लाल नेहरू स्कूल फॉर बॉयज या शाळेच्या इमारतीमध्ये एक अतिरिक्त माळा तयार करणे

भारत-पॅलेस्टाईन संबंध

भारत हा पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनला (PLO) “पॅलेस्टाईन लोकांचा एकमात्र वैध प्रतिनिधी” म्हणून मान्यता देणारे प्रथम गैर-अरब देश होता. भारत आणि पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) यांच्यात 1974 साली पहिल्यांदा संबंध प्रस्थापित झालेत. 1975 साली नवी दिल्लीत PLO चे कार्यालय स्थापना करण्यात आले आणि मार्च 1980 मध्ये दोन्ही देशांमध्ये पूर्णता राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यात आलेत. 18 नोव्हेंबर 1988 रोजी अंगिकारलेल्या घोषणापत्रानंतर भारताने पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली.