भारत-बांग्लादेश मध्ये संयुक्त सैन्यदल ‘अभ्यास संप्रिती 2019’ची सुरुवात झाली

0
212

भारत आणि बांग्लादेश 2 मार्च ते 15 मार्च 2019 दरम्यान बांग्लादेशातील तंगेल येथे ‘अभ्यास संप्रिती 2019’ संयुक्त सैन्य अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.

• या अभ्यासाची ही आठवी आवृत्ती आहे जो दोन्ही देशांद्वारे आळीपाळीने आयोजित केली जाते.
• सध्या चालू असलेल्या भारत-बांग्लादेश संरक्षण सहकार्याचा भाग म्हणून, ‘अभ्यास संप्रिती’ हा भारत आणि बांग्लादेश यांच्यातील एक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय प्रयत्न आहे.
• भारतीय आणि बांगलादेशातील सैन्यांदरम्यान आंतरपरिभायित्व आणि सहकार्याच्या पैलूंना बळकट आणि विस्तारीत करण्याचा हेतू आहे.
• या अभ्यासात युनायटेड नेशन्सच्या आदेशानुसार विरोधी विद्रोह आणि दहशतवादाच्या वातावरणात सामरिक पातळीवरील ऑपरेशन समाविष्ट करण्यात आले आहेत.

अभ्यास संप्रिती :

• अभ्यास संप्रिती हा भारत-बांग्लादेश दरम्यान दरवर्षी होणारा एक संयुक्त प्रशिक्षण अभ्यास आहे जो आळीपाळीने भारत आणि बांगलादेशात आयोजित करण्यात येतो.
• या अभ्यासाचा मुख्य उद्दीष्ट भारत आणि बांग्लादेशाच्या सैन्यामधील सकारात्मक संबंध तयार करणे, मजबुत करणे आणि प्रोत्साहन देणे आहे.
• सामरिक पातळीवरील ऑपरेशन्समध्ये एकमेकांना समजून घेण्याव्यतिरिक्त, या अभ्यासाने दोन्ही देशांतील सैन्य विश्वास आणि सहकार्य मजबूत करण्यासाठी अधिक सांस्कृतिक समजांवर भर दिला जातो.
• 2011 मध्ये पहिल्यांदा आसाममध्ये हा संयुक्त उपक्रम सुरू करण्यात आला होता.