भारत-जिबुतीमध्ये करार

0
14

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित आज भारत आणि जिबुती या दोन देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित आज भारत आणि जिबुती या दोन देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी जिबुतीचे अध्यक्ष ओमर गुलेह ही उपस्थित होते.

जिबुती आणि इथिओपिया या दोन देशांच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी कोविंद यांचे मंगळवारी येथे आगमन झाले. राष्ट्रपती झाल्यानंतरचा गोविंद यांचा हा पहिलाच विदेश दौरा आहे. कोविंद यांचे आज अध्यक्षीय निवासस्थानी गुल्लेह यांनी समारंभपूर्वक स्वागत केले. त्यानंतर कोविंद आणि गुलेह यांच्यात शिष्टमंडळ पातळीवरील चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्र कार्यालयांच्या पातळीवरील सल्लामसलतीसंदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी “ऑपरेशन राहत’च्या काळात जिबुतीने केलेल्या सहकार्याबद्दल कोविंद यांनी गुलेह यांचे आभार मानले. 2015मध्ये युद्धग्रस्त येमेनमधून भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी जिबुतीकडून मदत देण्यात मिळाली होती. 

जिबुतीला भेट देणारे कोविंद हे पहिलेच भारतीय नेते आहेत. सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या जिबुतीमध्ये चीनने आपला पहिला देशाबाहेरील लष्करी तळ उभारला आहे. त्या पार्श्वभूमीवर कोविंद यांच्या जिबुती दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.