भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांची उच्चस्तरीय बैठक

0
162

भारत आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलांची उच्चस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत तटरक्षक दलाच्या मुख्यालयात झाली. दोन्ही देशांमध्ये 2015 साली झालेल्या सामंजस्य करारानुसार ही बैठक झाली. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंगलेड आणि व्हिएतनामच्या तटरक्षक दलाचे प्रमुख मेजर जनरल ग्योयेन वॅनसोन्लेड यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली.

या सामंजस्य करारानुसार दोन्ही देशातील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर बैठकीत सहमती झाली. तसेच दोन्ही देशातील व्यवस्थापकीय कौशल्ये आणि प्रत्यक्ष कृतीसाठी आवश्‍यक व्यवस्था आणि तंत्रज्ञान याची देवघेव करण्यावरही यावर सहमती झाली.
 
 
सागरी सुरक्षा क्षेत्रात दोन्ही देशांमधले सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात आला होता. व्हिएतनामचे सहा सदस्यीय शिष्टमंडळ चेन्नईलाही जाणार असून भारतात येणाऱ्या पहिल्या व्हिएतनाम तटरक्षक जहाजाच्या स्वागत समारंभात हे शिष्टमंडळ सहभागी होईल. त्यानंतर दोन्ही देशांच्या तटरक्षक पथकांचा 4 ऑक्‍टोबरला चेन्नईत संयुक्त सराव होणार आहे.