भारतीय व्हिसा मिळविणाऱ्या परदेशी व्यक्तीने आता अपराधिक रेकॉर्ड उघड करणे आवश्यक

0
193

भारतीय व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या विदेशींना आता भारताच्या नवीन व्हिसा स्वरूपाच्या एक भाग म्हणून त्यांचे अपराधिक रेकॉर्ड घोषित करावे लागतील. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या विनंतीने परराष्ट्र नागरिकांच्या व्हिसा अर्जांच्या प्रक्रियेसाठी अशा तरतुदीचा प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला.

सोशियल मिडीया अॅप ट्विटर द्वारे, WCD मंत्री मेनका गांधी यांनी याची पुष्टी केली की, भारतात प्रवास करणाऱ्या परदेशी नागरिकांना कोणतेही अपराधिक रेकॉर्ड घोषित करून व्हिसा अर्ज प्रक्रियेत सुधारणा करण्याची विनंती स्वीकारण्यात आली आहे.

उद्दिष्ट
बाल लैंगिक अपराधींना (TCSOs) भारतात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी आणि मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारपासून इथल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षणात्मक यंत्रणेची नियुक्ती सुनिश्चित करण्याचा हेतू आहे.
त्यामुळे, बाल लैंगिक अत्याचार आणि प्रवाश्यांनी केलेल्या इतर गुन्हांची तपासणी करण्याचे हेतू आहे.

ठळक वैशिष्ट्ये
• नवीन स्वरूपात, व्हिसा अर्ज फॉर्ममध्ये एक योग्य प्रश्नावली आणि घोषणापत्र सामील केले जाईल, जे व्हिसा अर्जदारांनी भरणे अनिवार्य असेल.
• मुलांसोबत गैरवर्तनसारखे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी दृढ निरोधक बनण्याचा हेतू आहे.
• भारत आपल्या सौम्य व्हिसा नियमांमुळे बाल लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांसाठी सर्वोत्कृष्ट गंतव्यस्थान बनला आहे.
• अशा अनेक घटना आहेत ज्यात परदेशात मुलांसोबत गैरवर्तन करणारे गुन्हेगार तिथून पळून भारतात येतात आणि भारतात सेक्स रॅकेट चालवतात.
• नवीनतम ज्ञात गुन्हात ऑस्ट्रेलियन नागरिक पॉल डीन याचा समावेश आहे, ज्याला अलीकडे विशाखापट्टणम आणि पुरी येथील दिव्यांग गरीब मुलांचे लैंगिक शोषण केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते.