भारतीय वंशाच्या रवी भल्ला यांची होबोकेनच्या महापौरपदी निवड

0
8

अमेरिकेतील होबोकेन शहराच्या महापौरपदी भारतीय वंशाचे रवी भल्ला यांची निवड झाली आहे. महापौरपदाच्या शर्यतीत सहा उमेदवार होते. मात्र सर्वांना मागे टाकत भल्ला यांनी बाजी मारली आहे.

ठळक मुद्दे : 

# प्रचाराच्या कालावधीमध्ये अज्ञात लोकांनी वाटलेल्या पत्रकांमध्ये भल्ला यांचा उल्लेख दहशतवादी म्हणून करण्यात आला होता. 

# भल्ला यांची महापौरपदी निवड झाल्याचे सध्याच्या महापौर डॉन झिमर यांनी जाहीर केले. झिमर यांनी आपण तिसऱ्यांदा महापौर बनण्यासाठी इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर या निवडणुकीत भल्ला यांनी उतरण्याचे निश्चित केले आणि त्यांना विजयही मिळाला.

# मागच्या आठवड्यात भल्ला यांच्या फोटोवर ‘तुमच्या शहरावर दहशतवादाचा ताबा येऊ देऊ नका’! असे छापलेली पत्रके शहरातील सर्व गाड्यांवर लावण्यात आली होती.

# ही पत्रके महापौरपदाच्या शर्यतीतील दुसरे उमेदवार माईक डिफ्युस्कोज यांच्या नावाने काढण्यात आली असली तरी माईक यांनी यामध्ये आपला सहभाग नव्हता असे स्पष्टीकरण दिले होते.