भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बात्रा यांची निवड

0
19

आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे (एफआयएच) प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या (आयओए) अध्यक्षपदावर चार वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे, तर राजीव मेहता यांची सरचिटणीस पदावर बिनविरोध निवड झाली आहे.

# आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे [एफआयएच] प्रमुख नरिंदर बात्रा यांची भारतीय ऑलिम्पिक असोशिएशनच्या आयओएच्या अध्यक्षपदावर चार वर्षाच्या कार्यकाळासाठी निवड झाली आहे.

राजीव मेहता यांची सरचिटणीस या पदावर निवड झाली आहे. आशियाई टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना यांनी माघार घेऊन अध्यक्षपदासाठी बात्रा यांची निवड केली.

# अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर २०३२ च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा, २०३० च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २०२६ च्या राष्ट्रकुल स्पर्धाच्या भारताच्या यजमानपदाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. 

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (Indian Olympic Association/IOA) 

ऑलिंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक मीट्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी ऍथलीट निवडण्यासाठी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आहे. हे राष्ट्रकुल क्रीडा संघटना म्हणून काम करते, राष्ट्रकुल खेळात भारत प्रतिनिधित्व करण्यासाठी खेळाडूंचे चयन करण्यास जबाबदार आहे