भारताचे पहिले इलेक्ट्रिक हाय-स्पीड लोकोमोटिव्ह

0
28

बिहारच्या मधेपुरा येथील रेल इंजन कारखान्यात फ्रांसची कंपनी एल्सटॉम यांच्याकडून भारताचे पहिले संपूर्णताः इलेक्ट्रिक हाय-स्पीड लोकोमोटिव्ह तयार करण्यात आले आहे.

फ्रांसची कंपनी एल्सटॉम यांच्याकडून झालेल्या गुंतवणूकीमधून मधेपुरा कारखानामध्ये भारताने संयुक्त उपक्रमातून हे इंजन बनविले आहे. 20,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांतर्गत 11 वर्षांच्या कालावधीमध्ये एकूण 800 प्रगत हॉर्सपावर लोकोमोटिव्ह बनविण्याचे अपेक्षित आहे. भारताचा रशिया, चीन, जर्मनी आणि स्वीडन सहित त्या देशांच्या यादीत समावेश होणार, ज्यांच्यापाशी 12,000 HP वा त्याहून अधिक क्षमतेचे इलेक्ट्रिक इंजन आहे.

इंजनची वैशिष्ट्ये 

# विजेच्या बचतीसाठी नव्या इंजनमध्ये LED दिवे आणि लो-वोल्टेज केबल्स लावले गेले आहेत.

# इंजन विजेच्या बचतीच्या दृष्टीने IGBT (इंसुलेटेड गेट बायपोलर ट्रांझीस्टर) आधारित प्रोपल्शन टेक्नॉलॉजीने सुसज्जित आहे. यामध्ये ABB ट्रांसफॉर्मर बसविण्यात आले आहे.

# हे इंजन 9 MW (मेगावॉट) क्षमतेचे आहे. हे इंजन ताशी 120 किलोमीटर या कमाल वेगाने धावू शकते.

# 12,000 हॉर्सपॉवर (HP) क्षमतेचे हे इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह (इंजन) आहे.