भारताचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंग निवृत्त

0
325

भारताचा वेगवान गोलंदाज रुद्र प्रताप सिंगने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.13 वर्षांपूर्वी 4 सप्टेंबर 2005 रोजी पहिल्यांदा आपण टीम इंडियाची जर्सी घातली होती.

रुद्र प्रताप सिंगने 2007 मध्ये झालेला पहिला टी-20 विश्वचषक भारताला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने या स्पर्धेत एकूण 12 बळी घेतले होते. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने 58 एकदिवसीय आणि 14 कसोटी सामन्यांता देशाचे प्रतिनिधित्व केले. रुद्र प्रताप सिंगने आपला पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना 2005 मध्ये झिम्बाम्बेविरुद्ध, तर शेवटचा सामना 2011ला इंग्लंडविरुद्ध खेळला होता. त्याने 14 कसोटी सामन्यांत 40 बळी घेतले, तर 58 एकदिवसीय सामन्यात 5.48 च्या सरासरीने 69 बळी टिपले. तसेच टी-20 क्रिकेटमध्येही त्याने 15 बळी घेतले आहेत.

रुद्र प्रताप सिंगला 2011 नंतर भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये तो पर्पल कॅप परिधान करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला होता. निवृत्तीची घोषणा केल्यानंतर क्रिकेट जगतातून त्याला पुढील वाटचालीसाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, पार्थिव पटेल आणि महंमद कैफसह अन्य दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.