भाजप देशातील सर्वात श्रीमंत राजकीय पक्ष

0
22

मागील १० वर्षांत देशातील राष्ट्रीय पक्षाच्या संपत्तीत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. ही माहिती राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या इलेक्शन वॉच या संस्थेच्या ताज्या अहवालात समोर आली आहे. या कालावधीत भाजपच्या संपत्तीत ६२५ टक्के ऐवढी वाढ झाली आहे.

# मागील १० वर्षांत देशातील राष्ट्रीय पक्षाच्या संपत्तीत तब्बल पाचपट वाढ झाली आहे. ही माहिती राजकीय पक्षांवर लक्ष ठेवणाऱ्या इलेक्शन वॉच या संस्थेच्या ताज्या अहवालात समोर आली आहे. या कालावधीत भाजपच्या संपत्तीत ६२५ टक्के ऐवढी वाढ झाली आहे. हे वृत्त निवडणूक खर्चात नियंत्रण आणावे यावर चर्चा सुरू असतानाच आले आहे.

# सात राष्ट्रीय पक्षांच्या संपत्तीत मागील १० वर्षांत ५३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या पक्षांची २००४-०५ मध्ये सरासरी संपत्ती ६१.६२ कोटी ऐवढी होती. २०१५-१६ मध्ये जी ३८८.४५ कोटीच्या घरात गेली आहे. भाजपमध्ये सर्वांत जास्त ही वाढ दिसून आली. भाजपकडे २००४-०५ मध्ये १२२.९३ कोटी रूपये होते. २०१५-१६ मध्ये जी ८९३.८८ कोटी झाली. म्हणजेच यामध्ये ६२७.१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. काँग्रेसची संपत्तीही १६७.३५ कोटींवरून ७५८.७९ कोटी झाली आहे. म्हणजेच काँग्रेसच्या संपत्तीत सुमारे ३५३ टक्क्यांची वाढ झाली आहे.