ब्रेल दिवस – 4 जानेवारी

0
436

जगभरात एका व्याक्तीच्या स्मरणात ४ जानेवारी हा ब्रेल दिवस म्हणून साजरा केला जातो. अंधत्वाने खचून न जाता बोटांच्या स्पर्शाने वाचली जाणारी ब्रेल लिपी तयार करून अंधांसाठी ज्ञानाचा प्रकाश खुला केला. या लिपीचा उपयोग आज जगभरातील अंध व्यक्तींना होत आहे.

लुई ब्रेल यांचा जन्म फ्रान्सच्या कुपव्रे नावाच्या खेड्यात एका कष्टकरी कुटुंबात ४ जानेवारी १८०९ रोजी झाला. त्यांचे वडील सायमन रेने ब्रेल हे शाही घोड्यांच्यासाठी खोगीर तयार करण्याचे काम करत. लुई यांचे वडील दिवसभर कामात मग्न असत. लुई हे तीन वर्षाचे असल्यापासून त्यांच्या साहित्यांनी खेळत असत. खेळतान लुई यांनी वडिलांच्या साहित्यातील आरी उचलली व तीच  लुई यांच्या डोळ्याला लागली. लुई यांच्या डोळ्याला जखम झाली होती.  डोळ्यावर आधी काही स्थानिक उपचार करण्यात आले आणि नंतर जवळच्या खेड्यातील एका नेत्रतज्ज्ञाने त्याच्यावर उपचार केले. काही वेळाने लुई यांच्या डोळ्यास आराम मिळाला पण तेव्हाच डोळ्याला संसर्ग झाला होता. एका डोळ्याला झालेला संसर्ग वाढत दुसर्या डोळ्यापर्यंत गेला आणि एका वर्षात लुई यांचे दोन्ही डोळे पूर्णपणे खराब झाले. यामुळेच लुई यांना कायमचे अंधत्व आले.

धर्मगुरु पॅलुय यांच्या मदतीमुळे झाले शिक्षण सुरु

१८१६ मध्ये लुई यांच्या गावात ऍबे जाक पॅलुय नामक एक  धर्मगुरु (पाद्री) आले होते. त्यांच्या मदतीने लुई यांचे शिक्षण सुरू झाले. सुरूवातीला त्यांनी लुई यांना  वासाच्या आणि स्पर्शाच्या सहाय्याने वस्तु परिचय करून दिला.  तसेच संगीत आणि बायबलचे शिक्षणही सुरू केले.  यानंतर एक वर्षाने लुई यांना  गावातीलच सामान्य मुलांच्या शाळेत पाठविण्यात आले. अभ्यासात लुई हुशार होते, केवळ श्रवणाच्या जोरावर त्याने केलेली प्रगती पाहून लोकांना आश्चर्य वाटत असे.  या शाळेत लुई दोन वर्षे शिकले.  

अंधत्व आल्यानंतर लुईस यांनी न हरता त्यांच्या नावानेच एक लिहण्याची पद्धत विकसित केली. ज्याच्यामध्ये सहा कोड होते. त्यालाच कालांतरांने ब्रेल लिपी असे नाव मिळाले. ब्रेल लिपीवर पहिले पुस्तक १८२९ मध्ये प्रकाशित झाले. 

लुईस यांचा ४३ व्या वर्षी मृत्यू झाला. मात्र अंधांना त्यांची भाषा मिळवून देणारा अवलिया आजही त्यांच्या ब्रेल लिपीच्या माध्यामातून जीवंत आहे.