‘ब्रिटीश पोलिसिंग’च्या प्रमुखपदी भारतीय वंशाची उद्योजिका

0
15

ब्रिटनच्या कॉलेज ऑफ पोलिसिंग कॉलेजच्या प्रमुखपदी भारतीय वंशाच्या उद्योजिकेची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिली बॅनर्जी 

# मिली बॅनर्जी असे या 71 वर्षीय उद्योजिकेचे नाव असून, त्यांचा जन्म कोलकता येथे झाला होता. ब्रिटीश पोलिस समितीचे व्यावसायिक पातळीवर कामकाजाचे निरिक्षण करणे आणि अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान याच्या चाचण्या घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

# मुख्य कार्यकारी अधिकारी माइक कनिंगहॅम यांच्याबरोबर करण्यात आलेली बॅनर्जी यांची नियुक्ती संघटनेच्या व्यावसायिक धोरणास मदतशील ठरेल.  खाजगी आणि सार्वजनिक विभागातील कामांसह पोलिस खात्यातील कामांचाही मिली यांना उत्तम अनुभव आहे. 

# ब्रिटनमधील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रात दीर्घ आणि विविध प्रकारची कारकीर्द असणाऱ्या बॅनर्जी यांना नागरी सेवा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल 2002 मध्ये क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्याकडून सी.बी.ई.ने सन्मनित केले होते. 

# मिली बॅनर्जी सात वर्षे ब्रिटिश ट्रान्सपोर्ट पोलिस अथॉरेटीत कार्यरत होत्या. तसेच यूके केबिनेट कार्यालयाच्या  अकार्यकारी संचालक, प्रिझन्स बोर्ड, पीबॉडी ट्रस्ट आणि मिडिया वॉचडॉग ऑफकॉम यांसारख्या अनेक अकार्यकारी पदांवर देखील त्यांनी काम केले आहे.

# बॅनर्जी या सध्या ईस्ट लंडन एन.एच.एस. फाउंडेशन ट्रस्ट च्या बोर्ड सदस्य व एन.एच.एस. रक्त आणि प्रत्यारोपण खात्यावर कार्यरत आहेत.