बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना

0
23

भारतीय सैन्यातील आणि सुरक्षा बलातील शहिद जवानांच्या पत्नीला सन्मान योजनेच्या अंतर्गत आगामी 1 मे 2018 पासून ही योजना राबविण्याचे निर्देश 11 एप्रिल रोजी राज्यात देण्यात आले आहे.

# भारतीय सैन्य आणि सुरक्षा बलातील जवानांना देश संरक्षणासाठी हौतात्म्य प्राप्त होते. शाहिद झालेल्या जवानास आणि त्यांच्या परिवाराचा कालांतराने समाजाला विसर पडतो. अशा जवानांची आठवण समाजात कायम तेवत राहावी तसेच शहिद जवानांच्या पत्नीला सन्मान देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने राज्यात बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजना सेवा सुरु केली आहे.

# ही योजना राबविण्यासाठी अध्यादेश काढला गेला असून, महामंडळाचे राज्य महाव्यवस्थापक वाहतूक यांनी प्रत्येक जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात अधिकृत यादी मिळवून ओळखपत्र तयार करण्याचे संबंधित आगार प्रमुखांना आदेश दिले आहेत.

# शाहिद जवान व त्याच्या वीर पत्नीचे छायाचित्र प्राप्त करून ओळखपत्राच्या पासेस जवानांच्या घरी भेट देत सन्मानाने पोहोचविण्याचे कळविले आहे.

# महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व सर्व विभाग नियंत्रकांना ही योजना काटेकोरपणे राबविण्याचे आदेश आले असून  प्रत्येक आगार प्रमुखांकडे या आदेशाची प्रत पाठविली गेली आहे.