बांगलादेशातील पहिल्या महिला मेजर जनरल

0
348

बांगलादेशातील इतिहासात पहिल्यांदाच सैन्यात मेजर जनरल होण्याचा मान एका महिलेला मिळाला आहे. त्यांचे नाव आहे डॉ. सुसाने गिती. बांगलादेशचे आर्मी चिफ जनरल अझिझ अहमद आणि लेफ्टनंट जनरल एमडी शमशूल हक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बांगलादेशाच्या सैन्यदलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गिती या सैन्य दलाच्या वैद्यकीय महाविद्यालयातील पॅथालॉजी विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्या एमबीबीएस असून त्यांच्याकडे MCPS, FCPS, MMAD या पदव्याही आहेत. त्यांचे पती निवृत्त ब्रिगेडियर जनरल असून त्यांचे नाव असदुल्ला हसिन साद असे आहे. ते नामवंत सैन्यातील फिजिशियन होते. गिती यांनी १९८५ मध्ये राजशाही वैद्यकीय महाविद्यालयातून आपली डॉक्टरकीची पदवी घेतली. 

 त्यानंतर त्यांनी १९८६ मध्ये सेन्यदलात कॅप्टन पदावर फिजिशियन म्हणून कामास सुरुवात केली. त्यावेळी हेमॅटॉलॉजी विषयात पदवी घेणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहीमेत त्यांनी पॅथालॉजिस्ट म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.