बँक्स बोर्ड ब्युरोचे अध्यक्षपदी भानू प्रताप शर्मा

0
25

केंद्र सरकारकडून माजी CAG प्रमुख विनोद राय यांना बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) च्या अध्यक्ष (चेअरमन) पदावरून हटविण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती केली आहे.

# केंद्र सरकारकडून माजी CAG प्रमुख विनोद राय यांना बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) च्या अध्यक्ष (चेअरमन) पदावरून हटविण्यात आले आहे आणि त्यांच्या जागी भानू प्रताप शर्मा यांची नियुक्ती केली आहे.

# सोबतच तीन नव्या सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामध्ये आहेत – वेदिका भंडारकर, पी. प्रदीप कुमार आणि प्रदीप पी. शाह.

बँक्स बोर्ड ब्युरो (BBB)

बँक्स बोर्ड ब्युरो (BBB) भारत सरकारची एक स्वायत्त संस्था आहे. याच्या कार्यास एप्रिल 2016 पासून प्रारंभ झाला. याचे कार्यालय RBI च्या केंद्रीय कार्यालयात मुंबईमध्ये आहे. BBB शासकीय बँकांच्या कार्यात सुधारणा आणण्यासाठी भारत सरकारच्या ‘इंद्रधनुष’ धोरणाच्या सात घटकांपैकी एक आहे. यामध्ये पुनः-भांडवल, मालमत्तेची तनावमुक्तता, सक्षमीकरण, जबाबदारी आणि प्रशासन सुधारणांची कार्यचौकट यांचा समावेश आहे.