फोर्ब्सच्या सर्वोत्तम १० श्रीमंत महिला यादीत पी. व्ही. सिंधूचा

0
494

२०१८ सालात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूला पहिल्या १० खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. सिंधू या यादीमध्ये सातव्या स्थानावर आहे.

सिंधूने यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून अंदाजे ६० कोटी रुपये कमावले आहेत. विशेष म्हणजे सिंधू ही पहिल्या १० जणांमध्ये एकमेव बॅडमिंटन खेळाडू आहे. या यादीमध्ये अमेरिकेची स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सने पहिले स्थान पटकावले आहे. यंदाच्या वर्षात जाहीरातींच्या माध्यमातून सेरेनाने १८.१ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची कमाई केली आहे. ही यादी फोर्ब्सने काल जाहीर केली.