फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानी

0
227

फोर्ब्स मॅगझिनने श्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत रिलायन्स इंडस्ट्रिजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पहिल्या स्थानी इंडियाज 100 रिचेस्ट लिस्टमध्ये मुकेश अंबानींनी लागोपाठ 11 व्या वेळेस पहिले स्थान पटकावले आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे 4730 कोटी डॉलर(3.40 लाख कोटी)ची संपत्ती आहे. तसेच विप्रोचे अध्यक्ष अजिम प्रेमजी या यादीत दुस-या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2100 कोटी डॉलर(1.51लाख कोटी रुपये) आहे. आर्सेलर मित्तलचे मालक लक्ष्मी मित्तल हे 1830 कोटी डॉलर(1.31 लाख कोटी रुपये)सह तिस-या क्रमांकावर आहेत. चौथ्या स्थानी हिंदुजा ब्रदर्सना संधी मिळाली आहे. अशोक, गोपीचंद, प्रकाश आणि श्रीचंद हिंदुजा यांची एकूण संपत्ती 1800 कोटी डॉलर(1.29 लाख कोटी रुपये) आहे. बांधकाम व्यावसायात दबदबा असलेल्या शापूरजी पालोनजीचे मालक पालोनजी मिस्त्री या यादीत पाचव्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1570 कोटी डॉलर(11.3 लाख कोटी रुपये) आहे.