फोर्ब्सच्या यादीत मोदी टॉप टेनमध्ये, अंबानींचाही समावेश

0
15

फोर्ब्सनं प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींच्या ताज्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ९व्या स्थानी आहेत.तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे ३२व्या स्थानी आहेत.

विशेष म्हणजे मोदी यांचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल असल्याचंही फोर्ब्सनं म्हटलंय. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे या यादीत अव्वल स्थानी आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मागे टाकत ते अव्वल स्थानी विराजमान झाले आहेत. 

७५ लोकांनी बदलले जग 

जगात सुमारे साडे सात अब्ज लोक राहतात. मात्र त्यांपैकी ७५ महिला आणि पुरुषांनी जगात बदल घडवण्यात आपले महत्त्वाचे योगदान दिल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. दहा कोटी लोकांमधून एक असामान्य व्यक्ती पुढे आल्याचं आमच्या यादीद्वारे स्पष्ट होत असल्याचं फोर्ब्सनं म्हटलंय.