फोर्ब्सच्या यादीत झळकले तीन भारतीय उद्योगपती

0
45

‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध नियतकालिकाने जगातील १०० सर्वश्रेष्ठ उद्योजकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताच्या तीन उद्योजकांनी स्थान पटकावले आहे. ‘१०० ग्रेटेस्ट लिव्हिंग बिझनेस माईंडस’ 100 Greatest Living Business Minds या नावाने ही विशेष यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला अशी या तीन व्यावसायिकांची नावे आहेत.

अमेरिकेच्या फोर्ब्स मॅग्झिनने जगभरातील 100 विशेष आणि जिवंत बिझनेसमनची (100 Greatest Living Business Minds) याची जाहीर केली आहे. यात तीन भारतीय बिझनेसमननी स्थान पटकावले आहे. लक्ष्मी मित्तल, रतन टाटा आणि विनोद खोसला यांचा यात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे फोर्ब्सच्या या लिस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचेही नाव आहे. मॅग्झिनने त्यांना सेल्समन आणि एक्स्ट्रॉऑर्डिनरी रिंगमास्टर म्हटले आहे. या शिवाय अॅमेझॉनचे फाऊंडर जे. एफ. बिजोस आणि व्हर्जिन ग्रुपचे फाऊंडर रिचर्ड ब्रेसनन यांचे नाव या यादीत आहे.

फोर्ब्सने ही यादी आज जाहीर केली. यात तीन भारतीय बिझनेसमनचे नाव आहेत. यात रतन टाटांच्या नावाचा समावेश आहे. रतन टाटा हे टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत. लक्ष्मी मित्तल आर्सेलो मित्तल या कंपनीचे चेअरमन आणि सीईओ आहेत. तिसरे नाव विनोद खोसला यांचे आहे. सन मायक्रोसिस्टिम्सचे ते को-फाऊंडर आहेत.  फोर्ब्सच्या यादीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव आहे. मॅग्झिनने त्यांना ओनर ऑफ ट्रम्प ऑर्गनायझेशन म्हटले आहे.अॅमॅझोनचे जे. एफ. बिजोस, व्हर्जिन ग्रुपचे फाऊंडर रिचर्ड ब्रेसनन, बर्कशायर हथवेचे सीईओ वॉरन बफेट, मायक्रोसॉफ्टचे को-फाऊंडर बिल गेट्स आणि न्युज कार्पोरेशनचे कार्यकारी चेअरमन रुपर्ट मर्डोक यांच्या नावांचा समावेश आहे.
 
फोर्ब्स 
 
फोर्ब्स मॅग्झिनची स्थापना 17 सप्टेंबर 1917 रोजी झाली होती. बी. सी. फोर्ब्स आणि वॉल्टर ड्रे याचे फाऊंडर मेम्बर होते. फोर्ब्स हे बिझनेस जर्नलिस्ट होते.