फिफा अंडर १७ वर्ल्डकप इंग्लंडच्या नावी

0
18

१७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकपच्या स्पेन आणि इंग्लंड संघांमध्ये झालेल्या अंतिम लढतीत इंग्लंडने स्‍पेनवर विजय मिळविला आहे. इंग्‍लंडच्या या विजयामुळे १७ वर्षांखालील फुटबॉल वर्ल्डकपमध्ये इंग्‍लंडने अजिंक्यपदाला गवसणी घातली आहे. इंग्लंडने स्पेनची २-० अशी आघाडी मोडून काढत ५-२ अशा गोलफरकाने ही लढत जिंकली.

इंग्लंडने वयोगट फुटबॉल स्पर्धांचे आपणच जागतिक राजे आहोत, हे सिद्ध केले. त्याचबरोबर पिछाडीनंतरही इंग्लंड जिंकू शकते, हेही दाखवून दिले. इंग्लंडने विश्वकंरडक २० वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेपाठोपाठ काही महिन्यांतच विश्वकरंडक १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा जिंकली आणि स्पेनला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जिंकण्यात अपयश आले.

 

इंग्लंडचा रिॲन ब्रेवस्टर हा गोल्डन बूटचा मानकरी. त्याचे या स्पर्धेत सर्वाधिक आठ गोल 
इंग्लंडने ही स्पर्धा प्रथमच जिंकली
इंग्लंडने या स्पर्धेतील सर्व लढती जिंकल्या
यापूर्वीची सर्वोत्तम कामगिरी २००७ च्या स्पर्धेत. त्या वेळी उपांत्यपूर्व फेरीत हार
विश्वकरंडक १७ वर्षांखालील स्पर्धा जिंकणारा इंग्लंड हा नववा संघ. यापूर्वी ही कामगिरी नायजेरिया, स्वित्झर्लंड, मेक्‍सिको, ब्राझील, फ्रान्स, घाना, सौदी अरेबिया आणि सोविएत संघराज्याची
ही स्पर्धा जिंकणारा इंग्लंड हा चौथा युरोपिय देश. यापूर्वी ही कामगिरी स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि सोविएत संघराज्याकडून
स्पेन चौथ्यांदा उपविजेते. यापूर्वी १९९१, २००३ आणि २००७ च्या स्पर्धेत 
ब्राझीलचा गॅब्रिएला ब्रॅझाओ हा सर्वोत्तम गोलरक्षक 
ब्राझीलला तिसऱ्या क्रमांकाबरोबरच फेअर प्ले पुरस्कारही
स्पेन स्पर्धेतील त्यांच्या पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात पराजित 

सर्वाधिक गोलचा विक्रम

भारतातील स्पर्धा सर्वार्थाने विक्रमी ठरत आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक गोल या स्पर्धेत नोंदले गेले आहे. यापूर्वीचा १७२ गोलचा विक्रम होता. अखेरच्या दिवसातील दोन लढतींपूर्वी १७० गोल झाले होते. ब्राझील-माली या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत दोन गोल झाले, तर स्पेन-इंग्लंड या अंतिम लढतीत सात गोल झाले. त्यामुळे या स्पर्धेत एकंदर १७९ गोल झाले.