प्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश

0
171

केंद्र सरकारने गुगल आणि अॅपल यांना ‘टीक टॉक’ अॅप डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाने अॅपवर आणलेल्या बंदीवर स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारमधील दोन उच्चपदस्थ प्ले स्टोअरमधून Tik Tok अॅप डिलीट करण्याचे गुगलला निर्देश अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. सोशल मीडियावर ‘टीक टॉक’च्या शॉर्ट व्हिडिओनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे.भारतात ‘टीक टॉक’ अॅपचा गैरवापर होत असून अश्लिल मजकूर अपलोड करण्यात येत असल्याने या अॅपवर तात्काळ बंदी आणावी यासाठी मद्रास हायकोर्टाने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने अॅपवर बंदी आणली. या बंदीविरोधात सुप्रीम कोर्टात अपील करण्यात आले. सुप्रीम कोर्टाने बंदीवर स्थगिती आणण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी २२ एप्रिल रोजी होणार आहे. 

केंद्रातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, ‘टीक टॉक’ अॅप डाउनलोड करण्यात येऊ नये यासाठी मद्रास हायकोर्टाने निर्देश दिले आहेत. संबंधित खात्याने त्या निर्देशांचे पालन करत आता गुगल आणि अॅपल यांना टीक टॉक अॅप डिलिट करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या ज्यांनी टीक टॉक अॅप डाउनलोड केले आहेत, अशा युजर्सना त्याचा वापर करता येणार आहे. मात्र, नव्याने अॅप डाउनलोड करता येणार नाही. एका अभ्यासानुसार, मागील तिमाहीत टीक टॉक हे अॅप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरमधून डाउनलोड होणाऱ्या अॅपमध्ये जगात तिसऱ्या क्रमांकाचे अॅप ठरले होते. मार्च तिमाहीत टीक टॉकने १८.८ कोटी नवे युजर्स जोडले होते. त्यापैकी भारतातील ८.८६ टक्के युजर्स होते. मागील वर्षी अॅपच्या ५० कोटी युजर्सपैकी ३९ टक्क्यांपेक्षा अधिक युजर्स हे भारतातील होते.