प्रो-कबड्डीमध्ये पाटणा पायरेट्सची विजयी हॅटट्रीक

0
18

चढाईचा ‘सुपरमॅन’ प्रदीप नरवालने बचावपटूंना आव्हान देत मोसमातील आणखी एक ‘सुपर टेन’ करत पाटणा पायरेट्‌सचे विजेतेपदाच्या हॅटट्रिकचे स्वप्न साकार केले. पाचव्या मोसमाच्या अंतिम लढतीत पाटणा पायरेट्‌सने पदार्पणातच अंतिम फेरी गाठणाऱ्या गुजरात फॉर्च्युन जायंट्‌स संघावर ५४-३८ असा विजय मिळविला.

फायनल मॅचच्या पहिल्या सत्रात गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने आक्रमक सुरूवात केली होती. गुजरातने आक्रमक चढाई करत पाटणा टीमला धक्का दिला. सचिन तवंर आणि राकेश नरवाले पाटण्याच्या डिफेन्सला धक्का देत पाचव्या मिनीटाला पाटणा पायरेट्सला ऑलआऊट केलं. ऑलआऊट झाल्याने सुरूवातीला काहीसा बॅकफूटवर गेलेल्या पाटना पायरेट्सने सामन्यात कमबॅक केलं. पाटण्याचा कॅप्टन प्रदीप नरवार आणि मोनू गोयत यांनी जोरदार सुरूवात केली. प्रदीप आणि मोनू गोयतने पहिल्याच सत्रात अखेरीस १८-२१ अशी ३ गुणांची आघाडी घेतली.

प्रो कबड्डी लीग (PKL)

प्रो कबड्डी लीग (PKL) ही अतिशय प्रतिष्ठित , भारतातील एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै , इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले. याची दुसरी आवृत्ती १८ जुलै, इ.स. २०१५ रोजी सुरू झाली. सध्या ह्या स्पर्धेवर माशल स्पोर्टस् च्या व्यवस्थापकीय संचालक चारू शर्मा यांचे नियंत्रण आहे.

प्रो कबड्डी टीम :

१. बंगाल वॉरियर्स

२. बंगळूर बुल्स

३. दबंग दिल्ली

४. जयपूर पिंक पँथर्स

५. पटणा पायरेटस्

६. पुणेरी पलटण

७. तेलगू टायटन्स

८. यू मुम्बा