प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू

0
21

केंद्र सरकारने देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केले आहे. देशभरातील 7 लाख 58 हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.

सातवे वेतन आयोग 

जानेवारी २०१६ पासून प्राध्यापकांसाठी सातवा वेतन लागू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ३२९ राज्य विद्यापीठे आणि १२१९२ महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.

याशिवाय आयआयटी, आयआयएम, आयआएम, आयआयआयटी, निटी, आयआयएसआरई या सारख्या संस्थांमधील प्राध्यापकांनाही याचा फायदा मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. यामुळे केंद्राच्या तिजोरीवर २२ हजार कोटींचा भार पडणार आहे.