प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला, भूपेन हजारिका – नानाजी देशमुख यांना मरणोत्तर सन्मान

0
70

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवन येथे एका भव्य समारंभात 8 ऑगस्ट, 2019 रोजी भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.

• दिवंगत गायक भूपेन हजारिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिवंगत नेते नानाजी देशमुख यांनाही राष्ट्रपतींनी मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले.
• या समारंभ सोहळ्यास उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
• यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी या कार्यक्रमास विशेष अनुपस्थित होते, तर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंग हूडा, जनार्दन द्विवेदी, अहमद पटेल आणि आनंद शर्मा हे उपस्थित होते.
• चार वर्षानंतर भारत रत्न प्रदान करण्यात आला.
• 2015 मध्ये मोदी सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक मदन मोहन मालवीय यांना हा सन्मान प्रदान केला होता.
• भूपेन हजारिका यांचा भारत रत्न पुरस्कार त्यांचा मुलगा तेज यांनी, तर दीनदयाळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंग यांना नानाजी देशमुख यांच्या वतीने पुरस्कार स्वीकार केला.

भारतरत्न प्रणव मुखर्जी :

• प्रणव मुखर्जी हे भारताचे तेरावे राष्ट्रपती होते आणि ते या पदावर 2012 ते 2017 दरम्यान होते. भारतरत्न मिळवणारे ते पाचवे राष्ट्रपती बनले आहेत.
• त्यांच्या आधी हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या राष्ट्रापतींमध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन आणि व्हीव्ही गिरी यांचा समावेश आहे.
• प्रणव मुखर्जी वयाच्या 47 व्या वर्षी 1982 मध्ये भारताचे सर्वात युवा अर्थमंत्री झाले होते. 2004 पासून त्यांना परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि वित्त यासह प्रमुख मंत्रालयांमध्ये नेमण्यात आले होते.

भारतरत्न भूपेन हजारिका :

• आसाम आणि ईशान्य भारताची संस्कृती आणि लोक संगीत हिंदी चित्रपटसृष्टीत आणण्यात लोकप्रिय आसामी संगीतकार आणि चित्रपट निर्माते भूपेन हजारिका यांची मोठी भूमिका होती.
• त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी झाला होता आणि 5 नोव्हेंबर, 2011 रोजी त्यांचे निधन झाले.
• भूपेन हजारिका यांना 1977 मध्ये पद्मश्री, 1987 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1992 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2001 मध्ये पद्मभूषण आणि 2012 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
• गायक, पार्श्वगायक, गीतकार, कवी, संगीतकार आणि चित्रपट निर्माते म्हणून भूपेन हजारिका बहु-प्रतिभावान होते. त्यांनी 1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठातूनपीएचडी केली होती.
• 2004 मध्ये भाजपने गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती, पण ते अयशस्वी ठरले. यापूर्वी त्यांनी आसाममध्ये 1967 ते 1972 दरम्यान अपक्ष आमदार म्हणून काम केले होते.

भारतरत्न नानाजी देशमुख :

• नानाजी देशमुख यांचा जन्म 11 ऑक्टोबर, 1916 रोजी महाराष्ट्रातील हिंगोली येथे झाला होता.
• देशमुख यांनी संपूर्ण भारतभरात आरएसएस-प्रेरणादायी शाळांची एक श्रृंखला सुरू केली होती आणि 2010 मध्ये मध्य प्रदेशातील सतना येथे वयाच्या 94 व्या वर्षी त्यांचे निधन होईपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते.
• नानाजी देशमुख हे भारतीय जनता संघाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत, जे नंतर भारतीय जनता पार्टीमध्ये विकसित झाले.
• राजकारणात देशमुख यांनी 1977 ते 1979 दरम्यान यूपीच्या बलरामपूर मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून काम पाहिले होते.
• 1977 मध्ये जनता पक्षाच्या सरकार स्थापनेत देशमुख यांनी अग्रणी भूमिका निभावली होती आणि 1975 मध्ये आणीबाणीच्या विरोधात जे.पी. नारायण यांच्या आंदोलनातील महत्त्वाच्या सदस्यांपैकी ते एक होते.

पार्श्वभूमी :

• केंद्र सरकारने जानेवारी 2019 मध्ये भारत रत्न पुरस्कार 2019 जाहीर केले होते. प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना हा पुरस्कार दिला जाईल, असे सरकारने नंतर त्यावेळी जाहीर केले होते.
• या आकडेवारीनुसार, भारतरत्न पुरस्कारांची एकूण संख्या 48 इतकी झाली आहे.