प्रकाश पदुकोन यांना जीवनगौरव

0
16

भारतीय बॅडमिंटन महासंघातर्फे यंदापासून जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार असून त्याचा पहिला मान ऑल इंग्लंड स्पर्धा विजेते पहिले भारतीय खेळाडू प्रकाश पदुकोण यांना मिळाला आहे.

बंगळुरू येथे महासंघाच्या झालेल्या कार्यकारिणीत जीवनगौरव पुरस्कार सुरू करण्याचा ठराव संमत करण्यात आला.  पदुकोण यांनी १९८० मध्ये ऑल इंग्लंड स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारे ते  पहिलेच भारतीय होते. १९७८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्यांना सुवर्णपदक मिळाले होते, तर १९८३ मध्ये कोपनहेगन येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळविले होते.

प्रकाश पदुकोण
 
प्रकाश पदुकोण हे प्रसिद्ध बॅडमिंटन खेळाडू होते. सेवानिवृत्तीनंतर प्रकाश पदुकोण यांनी नवोदित युवा खेळाडूंच्या संरक्षणासाठी कार्य केले कारण युवा खेळाडू देशासाठी गौरव बनू शकतील. गीत सेठी सोबत ते प्रकाश पदुकोण बॅडमिंटन अकादमी चालवतात.