पुढील पाच वर्षात देशात पाच हजार बायोगॅस प्रकल्प

0
185

देशात पुढील पाच वर्षात देशात पाच हजार बायोगॅस प्रकल्प उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे. टाकाऊ कृषी माल, जनावरांचे शेण, गावातील कचरा इत्यादींपासून हा बायोगॅस तयार करण्याची सरकारची योजना आहे त्यासाठी पावणे दोन लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली जाणार आहे.

सरकारी मालकीच्या इंधन मार्केटिंग कंपन्याकडून 46 रूपये प्रति किलो दराने हा गॅस खरेदी केला जाईल. देशाला आज जे इंधन लागते त्यातील 81 टक्के इंधन विदेशातून आयात करावे लागते. या प्रकल्पातून जो कॉम्प्रेस्ड बायोगॅस तयार होईल तो सीएनजीच्या ऐवजी वाहनांमध्ये वापरता येईल असे ते म्हणाले. प्रधान म्हणाले की देशात रोज 146 दशलक्ष घन मीटर भूगर्भ वायूचा वापर होतो. त्यातील 56 टक्के भूगर्भ वायू विदेशातून आयात करावा लागतो.

देशात जे पाच हजार बायोगॅस प्रकल्प उभारले जातील त्यातून 75 हजार लोकांना रोजगार मिळू शकतील. देशातल्या 86 शहरांमध्ये हे प्रकल्प उभारण्याची सरकारची योजना आहे