पाणी समस्येबाबत आयआयटी खरगपुर मध्ये संशोधन केंद्र

0
212

खरगपुर येथील आयआयटी मध्ये पाण्याच्या पुनर्र वापराबाबतच्या संशोधन केंद्राची स्थापना केली जाणार आहे.विशेष म्हणजे याच महाविद्यालयातील दोन माजी विद्यार्थ्यांनी यासाठी आर्थिक मदत देऊ केली आहे. या केंद्रातर्फे आयआयटीच्या आवारातच वापरलेल्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याचा एक प्रकल्प सुरू केला जाणार असून त्यात 1.35 दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून त्यातून 1.2 दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी दररोज तयार केले जाणार आहे.

हा प्रायोगिक तत्वावरचा प्रकल्प मार्च 2019 पर्यंत कार्यान्वित होण्याच अपेक्षा आहे.या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रा. एम. एम. घांग्रेकर हे काम पहाणार आहेत.पाणी वापरा योग्य आहे की नाही याची काटेकोर तपासणी केली जाणार असून पाण्याच्या पुनर्रवापरावर सर्वाधिक भर दिला जाणार आहे.