‘पाइक विद्रोह’ हे पहिलं स्वातंत्र्ययुद्ध

0
34

ओडिशामध्ये सन १८१७मध्ये घडलेल्या ‘पाइक विद्रोहा’ची नोंद इतिहासाच्या पुस्तकांत पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून केली जाईल आणि हे बदल पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलात येतील.

पाइक विद्रोहाला दोनशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जावडेकर यांनी ही घोषणा केली. यानिमित्त केंद्राने २०० कोटी रुपयांची तरतूद केली.

सन १८५७मध्ये ब्रिटिश लष्करातील भारतीय सैनिकांनी पुकारलेला लढा हा ब्रिटिशांविरुद्धचा पहिला लढा मानला जातो. पण त्यापूर्वी ४० वर्षे हा लढा उभारण्यात आला होता. 

विद्यार्थ्यांनी खराखुरा इतिहास शिकावा या दृष्टिकोनातून ब्रिटिशांविरुद्धचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध, अशी पाइक विद्रोहाची नोंद इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत केली जाईल.

पाईक विद्रोह

पाईक विद्रोह (1817) हे ओरिसातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाविरुद्ध सशस्त्र बंड होते. पाईक लोकांनी भगवान जगन्नाथ यांना उडिया एकताचे प्रतीक मानले आणि 19 7 मध्ये बकी जगबंधू यांच्या नेतृत्वाखाली हे विद्रोह सुरू केले. लवकरच ही चळवळ ओरिसामध्ये पसरली परंतु इंग्रजांनी निर्दयतेने या चळवळीला दाबून टाकले.