पद्म पुरस्कार 2018

0
41

या वर्षी 85 लोकांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केले जाणार आहे. यामध्ये तिघांना पद्म विभूषण, 9 लोकांना पद्म भूषण आणि 73 लोकांना पद्म श्री दिले जाणार आहेत. यावेळी ASEAN मध्ये व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, इंडोनेशिया, मलेशिया, बु्रनेई, लाओस, थायंलॅंड, फिलीपीन्स येथील तसेच नेपाळ, अमेरिका, रशिया, जपान, सौदी अरेबिया, तजाकिस्तान येथील लोकांना पद्म सन्मान बहाल केला जाणार आहे.

पद्म पुरस्कार 2018 

 

पद्म भूषण

1) पंकज अडवाणी (कर्नाटक) – क्रीडा क्षेत्र (बिलियर्ड्स/स्नूकर) 

2) फिलिपोस मार ख्रिसोस्टम (केरळ) – अन्य (धार्मिक)

3) महेंद्र सिंह धोनी (झारखंड) – क्रीडा क्षेत्र (क्रिकेट) 

4) अलेक्जेंडर कदाकिन (मरणोत्तर – रशिया) – लोक कल्याण क्षेत्र 

5) रामचंद्रन नागास्वामी (तामिळनाडू) – अन्य (पुरातत्त्व)

6) वेद प्रकाश नंदा (अमेरिका) – साहित्य व शिक्षण क्षेत्र

7) लक्ष्मण पई (गोवा) – कला क्षेत्र (चित्रकला)

8) अरविंद पारिख (महाराष्ट्र) – कला (संगीत) 

9) शारदा सिन्हा (बिहार) – कला (संगीत)

पद्म विभूषण 

1) इलेयाराजा (तामिळनाडू) – कला (संगीत) 

2) गुलाम मुस्तफा खान (महाराष्ट्र) – कला (संगीत)

3) परमेश्वरन परमेश्वरन (केरळ) – साहित्य व शिक्षण 

पद्म श्री

ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे, पॅरा ऑलिंपिकमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून देणारे ७० वर्षीय जलतरणपटू मुरलीकांत पेटकर, गडचिरोलीतील आदिवासी बांधवांमध्ये उल्लेखनीय आरोग्यसेवा करणारे डॉ. राणी व अभय बंग, विदर्भातील दिवंगत आरोग्यसेवक संपत रामटेके, महाराष्ट्रातून सुरू झालेल्या ‘विद्यार्थ्यांसाठी टाकाऊतून टिकाऊ वैज्ञानिक खेळणी’ या संकल्पनेचे अध्वर्यू अरविंद गुप्ता यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात करण्यात येणार आहे. अभिनेते मनोज जोशी, उद्योगपती रामेश्‍वरलाल काब्रा, चित्रपट दिग्दर्शक शिशिर पुरुषोत्तम मिश्रा, कुष्ठरोग्यांसाठी काम करणारे डॉ. दामोदर गणेश बापट यांचा पद्मश्री विजेत्यांमध्ये समावेश आहे. महिला वेटलिफ्टर साईखोम मिराबाई चानू, टेनिसपटू सोमदेव देववर्मन, बॅटमिंटनपटू किदांबी श्रीकांत, सौदी अरेबियातील योगशिक्षिका नौफ मारवाई, व पश्‍चिम बंगालमधील ९९ वर्षीय समाजसेवक सुधांशू विश्‍वास यांचाही पद्मश्रीने सन्मान करण्यात येणार आहे. 

पद्म पुरस्कार माहिती 

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमधील एक असे ‘पद्म पुरस्कार’ तीन श्रेणी – पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री – यांमध्ये विजेत्या व्यक्तींना दिले जातात. 1954 साली या पुरस्कारांची स्थापना करण्यात आली. हे पुरस्कार दरवर्षी सहसा मार्च/एप्रिल मध्ये राष्ट्रपती भवनात एका समारंभात भारताचे राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतात. ‘पद्म पुरस्कार’ कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा, इ. विविध विषयातील/क्षेत्रातील उपक्रमांमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या नागरिकांना दिला जातो. कोणत्याही क्षेत्रात ‘पद्मविभूषण’ हा अपवादात्मक व प्रतिष्ठीत सेवेसाठी; ‘पद्मभूषण’ हा उच्च पातळीवर प्रतिष्ठीत सेवेसाठी आणि ‘पद्मश्री’ प्रतिष्ठीत सेवेसाठी दिला जातो.