पद्मविभूषण पुरस्कारासाठी बीबीसीआयकडून धोनीची शिफारस

0
22

‘पद्मभूषण’ सन्मानासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. टीम इंडियाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या माहीची एकमताने निवड झाली.

महेंद्रसिंग धोनी 

# 2007 मधील टी20 विश्वचषक आणि 2011 मधील विश्वचषक जिंकण्याचा मान धोनीला मिळाला आहे. धोनी आतापर्यंत 90 कसोटी सामने खेळला असून त्यामध्ये 4 हजार 800 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. तर 300 हून जास्त एक दिवसीय सामने खेळणाऱ्या धोनीने वनडेमध्ये 9 हजार 816 धावा ठोकल्या आहेत. धोनीने 78 टी20 सामने खेळले असून 1 हजार 212 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावावर 100 आंतरराष्ट्रीय
अर्धशतकांसह 16 आंतरराष्ट्रीय शतकं ( 6 कसोटी, तर 10 वनडे) जमा आहेत. विकेटकीपर म्हणून धोनीने 584 झेल घेतले आहेत (कसोटीमध्ये 256, वनडेमध्ये 285 आणि टी20 मध्ये 43).

# धोनीला आतापर्यंत अर्जुन पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं आहे.

# याआधी सचिन तेंडुलकर, कपिल देव, सुनिल गावस्कर, राहुल द्रविड, चंदू बोर्डे, प्रा. डीबी देवधर, कर्नल सीके नायडू, लाला अमरनाथ यांना पद्मभूषण मिळालं आहे.