‘पद्मभूषण’ सन्मानित वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू

0
184

‘पद्मभूषण’ने सन्मानित 83 वर्षीय वैज्ञानिक डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पत्नीच्या निधनानंतर कटियार निराश झाले होते, या धक्क्यातूनच त्यांनी विष पिऊन आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या वर्षी आजारपणातून पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मानसिक स्वास्थ्य गमावलं होतं. त्यामुळे विष पिऊन त्यांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

डॉ. सर्वज्ञ सिंह कटियार हे छत्रपती शाहू महाराज विश्वविद्यालय (सीएसजेएमयू) चे माजी कुलगुरु होते. एंझायमोलॉजी या विषयात त्यांनी नैपुण्य मिळवलं होतं. विज्ञान क्षेत्रातील योगदानासाठी 2003 मध्ये केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ प्रदान करुन त्यांचा सन्मान केला होता. तर 2009 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आलं होतं.