पद्मभुषण सतारवादक अन्नपूर्णा देवी यांचे निधन

0
298

भारत रत्न सम्मानित दिवंगत सतारवादक पंडित रविशंकर यांची पहिली पत्नी अन्नपूर्णा देवी यांचे निधन झाले.त्या 91 वर्षाच्या होत्या.

अन्नपूर्णा देवी भारतीय शास्त्रीय संगीतामधील सुप्रसिद्ध सदाबहार गायिका होत्या. त्या सुप्रसिद्ध सरोद वादक अलाउद्दीन खान यांच्या कन्या होत्या तसेच त्यांच्या वडिलांकडून त्यांना शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण मिळाले होते. 

त्यांनी सेनिया – माहेर घराणाची स्थापना केली होती. त्यांच्या सतार वादनाचे अनेक चाहते असून त्यांना त्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पद्मभुषण हा पुरस्कार देखील मिळाला होता. आजच्या काळात त्यांनी शास्त्रीय संगीत जपले होते. आशिष खान (सरोद), अमित भट्टाचार्य (सरोद), बहाद्दूर खान (सरोद), बसंत काबरा (सरोद) हरिप्रसाद चौरसिया (बासरी) यांसारखे संगीत क्षेतातील दिग्गज हे अन्नपूर्णा देवी यांचे शिष्य होते.