पंतप्रधान मोदी यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार

0
33

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवडय़ात ‘ग्लोबल गोलकीपर’ पुरस्कार देऊन बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वतीने गौरवण्यात येणार आहे. नेतृत्व व भारतातील स्वच्छता उद्दिष्टांची वचनबद्धता यासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

. २ ऑक्टोबर २०१४ रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानासाठी त्यांना गेट्स फाउंडेशनचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत स्वच्छ भारत मोहिमेत ९ कोटी शौचालयांची निर्मिती करण्यात आली असून २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत भारत हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट होते. भारतातील ९८ टक्के खेडय़ात सध्या शौचालये उपलब्ध करून देण्यात आली असून चार वर्षांपूर्वी हे प्रमाण ३८ टक्के होते.  बिल गेट्स फाउंडेशनने २४ सप्टेंबर रोजी पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे.

२०१४ मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर मानवी हक्कांचे उल्लंघन जास्त प्रमाणात झाल्याने हा पुरस्कार रद्द करण्यात यावा अशी मागणी दक्षिण आशियायी अमेरिकी गटाने केली आहे. त्यांनी मोदी यांना पुरस्कार देण्याबाबत टीका करणारे खुले पत्र जारी केले आहे. दरम्यान सीएनएनला बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनने पाठवलेल्या निवेदनात मोदी यांना पुरस्कार देण्याच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

स्वच्छ भारत योजनेपूर्वी ५०कोटी लोकांना स्वच्छतागृहाची सुविधा नव्हती आता त्यातील बहुतांश लोकांना ती मिळाली आहेत ही मोठी कामगिरी आहे असे गेटस फाउंडेशनचे म्हणणे आहे.