पंतप्रधान मोदींनी KMP एक्सप्रेसवे, बल्लभगड-मुजेसर मेट्रो रेल्वे लिंकचे उद्घाटन केले

0
185

नोव्हेंबर 19, 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंडली-मानेसर-पळवाल (KMP) पश्चिम परिधीय एक्सप्रेसवेच्या कुंडली-मानेसर विभागाचे उद्घाटन केले.

यासह त्यांनी 3.2 किमी लांबीचा बल्लभगड-मुजेसर मेट्रो रेल्वे लिंकचे ही उदघाटनह केले, ज्यामुळे दिल्ली आणि फरीदाबादच्या लोकांना प्रवास करण्यास मदत होईल आणि श्री विश्वकर्मा स्किल युनिव्हर्सिटीची पायाभरणी केली, हि पळवाल जिल्ह्यामधील दुधोला येथे तयार होत आहे.
गुरगाव, फरीदाबाद आणि बहादुरगड नंतर मेट्रो कनेक्टिव्हिटी मिळवणारे बल्लभगड हे हरियाणाचे चौथे शहर आहे.
यावर्षीच्या सुरुवातीला मानेसर ते पळवाल KMPचा भाग, ज्याची संपूर्ण लांबी 135.65 किलोमीटर आहे, सार्वजनिकरित्या सुरु केला गेला.

KMP एक्सप्रेसवे बद्दल
• KMP एक्सप्रेसवे हरियाणातील पाच जिल्ह्यांतून जाणार आहे – गुरग्राम, सोनीपत, मेवाट, झज्जर आणि पळवाल एक्सप्रेसवे प्रकल्पावर 6,400 कोटी रुपये खर्च झाले आहेत आणि 2,788 कोटी रुपयांच्या 3,846 एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे.
• कुंडली ते मानेसर पर्यंत ताशी लांबी 83 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. या पट्ट्यात 14 मोठे किंवा लहान पुल, 56 अंडरपास किंवा शेतीतील वाहनांच्या अंडरपास, सात इंटरसेक्शन आणि सात टोल प्लाझा असतील.
• एक्सप्रेसवे दिल्लीपासून रस्ते वाहतुक कमी करेल, विशेष करून राष्ट्रीय राजधानीत प्रवेश करणाऱ्या ट्रकांची संख्या कमी करून प्रदूषण कमी करण्यात मदत करेल.
• याशिवाय, हा प्रकल्प उत्तर हरियाणा आणि दक्षिणेकडील जिल्ह्यांमधील हाय-स्पीड लिंक देखील प्रदान करेल आणि हरियाणा ते शेजारच्या राज्यांमधील रहदारीसाठी विशेषतः व्यावसायिक रहदारीसाठी एक वेगवान हाय-स्पीड दुवा देईल.