पंतप्रधान मोदींचे ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तक

0
43

पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

# पंतप्रधान नरेंद्र मोदी आता विद्यार्थ्यांना धडे देणार आहेत. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं आज प्रकाशन करण्यात आलं. एक्झाम वॉरियर्स असं या पुस्तकाचं नाव आहे. यामध्ये परीक्षेच्या काळात तणावाला कसं दूर ठेवता येईल याबाबत त्यात मार्गदर्शन करण्यात आलं आहे.

# इंग्रजीव्यतिरिक्त भारतातील विविध भाषेत पुस्तक उपलब्ध होणार आहे. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जास्त मार्गदर्शन करणारं ठरणार आहे. पेंग्विन ही प्रकाशन संस्था हे पुस्तक प्रकाशित करणार आहे.

# पंतप्रधान त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अनेकदा विद्यार्थ्यांना सल्ले देत असतात. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षांपूर्वी ते विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमही करतात.

# यातूनच या पुस्तकाची कल्पना आकाराला आली आणि त्यांनी या विषयावरील आपल्या विचारांचे संकलन करण्याचे ठरवले.

# २०८ पानांचे हे पुस्तक पेंग्विन रँडन हाऊस इंडियाने प्रकाशित केलेले असून, ते अनेक भाषांमध्ये भाषांतरित करून देशभरात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

# या पुस्तकात, कुठलाही तणाव किंवा चिंता याशिवाय परीक्षेला कसे सामोरे जावे याबद्दल पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांनी जवळजवळ २५ ‘मंत्र’ दिले आहेत.

# परीक्षेशी संबंधित ताणाशी कसे जुळवून घ्यावे, परीक्षेच्या काळात शांत कसे राहावे, तसेच परीक्षा संपल्यानंतर काय करावे यासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ांवर त्यात भर देण्यात आला आहे.