पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सिओल शांती पुरस्कार 2018 देण्यात आला

0
312

22 फेब्रुवारी 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासाला हातभार लावण्याकरिता प्रतिष्ठित सिओल शांती पुरस्कार 2018 देण्यात आला.

• पंतप्रधान मोदी यांची स्वदेशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
• आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याबाबत प्रयत्न, जागतीक अर्थ व्यवस्थेच्या वाढीमध्ये भर टाकल्याबद्दल त्याचबरोबर भारतातील लोकांच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मोदींची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
• सिओल, दक्षिण कोरिया येथील भव्य समारंभात सिओल पीस प्राइज कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष क्वायन ई-हॉक यांनी हा पुरस्कार त्यांना दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावरील एक लघुपट देखील या कार्यक्रमात प्रदर्शित झाला.
• यासह, पीएम मोदी सिओल शांती पुरस्काराचे 14 वे प्राप्तकर्ता झाले आहेत.

‘मोदीनॉमिक्स’, ‘मोदी डॉक्ट्रिन’ आणि ‘एक्ट ईस्ट पॉलिसी’ :

• श्रीमंत आणि गरीब यांच्यात सामाजिक आणि आर्थिक असमानता कमी करण्यासाठी ‘मोदीनॉमिक्स’ याची सिओल पीस प्राइज कमेटीने मोदी आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी योगदानबद्दल प्रशंसा केली.
• भ्रष्टाचारविरोधी उपायांद्वारे सरकार स्वच्छ करण्यासाठी पंतप्रधानांच्या पुढाकाराचे समितीने कौतुक केले.
• ‘मोदी सिद्धांत’ आणि ‘एक्ट ईस्ट पॉलिसी’ अंतर्गत जगभरातील देशांसह सक्रिय परकीय धोरणाद्वारे क्षेत्रीय आणि जागतिक शांततेसाठी त्यांनी योगदान दिले आहे.
• समितीने जगभरातील 1300 हून अधिक उमेदवारांनी प्रस्तावित 100 हून अधिक उमेदवारांचे मूल्यांकन केले आणि पीएम मोदी यांना ‘2018 साली शांती पुरस्कारांसाठी योग्य उमेदवार’ म्हणून संबोधित करण्याचा निर्णय घेतला.
• नामांकन गटांमध्ये 300 कोरियन नागरिक आणि 800 आंतरराष्ट्रीय आहेत.

सिओल शांती पुरस्कार :

• 1988 साली सिओल, कोरियामध्ये झालेल्या 24 व्या ऑलिंपिक खेळांच्या यशाची आठवण म्हणून 1990 मध्ये सिओल शांती पुरस्कार स्थापित करण्यात आला. यात 160 राष्ट्रांनी भाग घेतला होता.
• जगभरात मोठ्या प्रमाणावर परिवर्तन होत असताना 1988 मध्ये ऑलिंपिक स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. इराण-इराक युद्ध नुकतेच संपले होते; अफगाणिस्तानमधील परिस्थितीशी संबंधित जिनेवा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली होती आणि शीत युद्ध आपल्या अंतिम चरणात होते.
• कोरियन द्वीपकल्प तसेच पूर्ण जगात शांतीसाठी उत्सुक कोरियन लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी हा पुरस्कार सुरु करण्यात आला.
• हा पुरस्कार मानवजातीच्या सुसंवाद, राष्ट्रांमध्ये आणि जगाच्या शांततेसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींना दर दोन वर्षांनी दिला जातो.
• पुरस्कार विजेत्याला 200,000 डॉलर्सचे मानधन आणि प्लॅक प्राप्त होते.
• भूतपूर्व विजेत्यांमध्ये माजी संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी महासचिव कोफी अन्नान, जर्मन चांसलर अँजेला मेर्केल आणि डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स आणि ऑक्सफॅमसारख्या आंतरराष्ट्रीय मदत संस्था समाविष्ट आहे.