न्यूट्रॉन ताऱ्यांतून गुरुत्वीय लहरी

0
19

पृथ्वीपासून सुमारे १३ कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलिनीकरणातून गुरुत्वीय लहरी आणि गॅमा किरण अतीनिल किरण आणि क्ष किरण अशा विद्युतचुंबकीय लहरी या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, असे महत्त्वाचे निरीक्षण लायगो व व्हर्गो प्रयोगशाळांच्या प्रकल्पातून हाती आले आहे.

पृथ्वीपासून सुमारे १३ कोटी प्रकाशवर्षे दूर अंतरावर दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलिनीकरणातून गुरुत्वीय लहरी आणि गॅमा किरण अतीनिल किरण आणि क्ष किरण अशा विद्युतचुंबकीय लहरी या पृथ्वीपर्यंत पोहोचतात, असे महत्त्वाचे निरीक्षण लायगो व व्हर्गो प्रयोगशाळांच्या प्रकल्पातून हाती आले असून ही अभूतपूर्व उत्पातांची घटना आहे. 

न्यूट्रॉनच्या विलिनीकरणातूनच सोने, प्लॅटिनम व युरेनियम हे मौल्यवान धातू निर्मिले जातात, असा निष्कर्षही विद्युतचुंबकीय लहरींद्वारे प्रथमच हाती आला आहे.

१३ कोटी प्रकाशवर्षे अंतरावर ही घटना घडली, म्हणजे ती इतकी वर्षे अगोदर घडलेली घटना आहे व तिचे पृथ्वीवरचे परिणाम आता आपण अभ्यासले आहेत. गुरुत्वीय लहरी आणि गॅमा किरण यांचे एकत्र परिणाम प्रथमच अभ्यासण्यात आले. दोन जुळे न्यूट्रॉन तारे हे एकमेकांभोवती फिरत असतात व त्यातूनच ते एकमेकांवर आपटून त्यांचे विलिनीकरण होते. त्या क्रियेत गुरुत्वीय लहरी तयार होतात.

या निष्कर्षांमुळे खगोलभौतिकी क्षेत्रातील अनेक विस्मयकारी शंकांचे उत्तर मिळेल, त्याचप्रमाणे अनेक नवे उत्कंठावर्धक प्रश्नही तयार होतील. गेल्याच महिन्यात गुरुत्वीय लहरींविषयीच्या संशोधनासाठी पदार्थविज्ञानातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होता.