नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेच्या आयोजकपदी पवन सिंह

0
21

नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धांच्या अंतिम सत्राचे यजमानपद भूषविण्याचा मान या वर्षी प्रथमच भारताला मिळाला असून “नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया’चे संयुक्‍त महासचिव आणि पुण्यात मुख्यालय असलेल्या गन फॉर ग्लोरी अकादमीचे सहसंस्थापक पवन सिंह यांची या स्पर्धेच्या स्पर्धा आयोजकपदी नियुक्ती झाली आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंज येथे हे अंतिम सामने नुकतेच सुरू झाले असून यामध्ये जगभरातील रायफल, पिस्टल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारातील चौथ्या आंतरराष्ट्रीय विश्वकरंडकात सहभागी झालेले खेळाडू आपला सहभाग नोंदविला आहे.

नवी दिल्ली येथील डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंज येथे हे अंतिम सामने नुकतेच सुरू झाले असून यामध्ये जगभरातील रायफल, पिस्टल आणि शॉटगन या नेमबाजी प्रकारातील चौथ्या आंतरराष्ट्रीय विश्वकरंडकात सहभागी झालेले खेळाडू आपला सहभाग नोंदविला आहे.

# अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या नेमबाजी विश्वकरंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीचे व्यवस्थापन सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी पवन सिंह यांच्यावर असून या निमित्ताने भारतातील नेमबाजी क्षेत्राला आणखी झळाळी प्राप्त होणार आहे.

पवन सिंह यांची कामगिरी 

याआधी पवन सिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवी दिल्ली येथे आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा भरविली होती. यादरम्यान झालेल्या रायफल आणि पिस्टल स्पर्धांचे मुख्य समन्वयक म्हणून पवन सिंग यांनी यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली होती. तसेच भारतीय नेमबाजी संघाचे प्रशिक्षकपदाची जबाबदारी देखील त्यांनी पेलली आहे. नेमबाजी क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल “इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्टस फेडरेशन’ अर्थात आयएसएसएफच्या वतीने त्यांना कांस्य पदक आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. नुकत्याच फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विश्व करंडक स्पर्धा, एशियन क्वालिफायिंग कोटा स्पर्धा आणि आठवी एशियन एअरगन चॅंपियनशिप या स्पर्धांसाठी सिंह यांनी समन्वयक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. तर कॉमनवेल्थ स्पर्धा, कॉमनवेल्थ यूथ गेम्स आणि वर्ल्ड मिलिटरी गेम्समध्ये सिंह हे “इक्‍विपमेंट कंट्रोल’ समितीचे सदस्य होते. याबरोबरच 2012 च्या ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक विजेता नेमबाज गगन नारंग यांच्या सोबत पवन सिंह यांनी पुण्यात “गन फॉर ग्लोरी’ या अकादमीची स्थापना केली असून आज देशभरात अकादमीच्या तब्बल 17 शाखा आहेत. या ठिकाणी लहान वयातच विद्यार्थ्यांमधील नेमबाजीचे कौशल्य ओळखून त्याला दर्जाचा खेळाडू बनविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जातात.