नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा

0
15

विश्वचषक पात्रता क्रिकेट स्पर्धेच्या प्लेऑमध्ये नेपाळने पापुआ न्यू गिनी संघाला ६ विकेट राखून हरवले. त्यामुळे नेपाळ क्रिकेट संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा मिळाला आहे.

# नेपाळच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने प्रथमच एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा प्राप्त केला आहे.

# हरारेमध्ये क्रिकेट विश्वचषक पात्रतेमध्ये पापुआ न्यू गिनी विरूद्धच्या सामन्यात विजय मिळवण्यासोबतच नेपाळने हा ऐतिहासिक क्षण देशाच्या इतिहासात नोंदवला.

# दीपेंद्र सिंग एरिच्या अष्टपैलू खेळाने नेपाळच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या पराभवामुळे गिनीने आपला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा गमावला.

# संदीप लॅमिचाने आणि दीपेंद्र यांनी प्रत्येकी चार बळी घेत पापुआ न्यू गिनीचा डाव २४.२ षटकात ११४ धावत गुंडाळला.

# त्यानंतर नेपाळने चार फलंदाजाच्या मोबदल्यात २३ षटकात विजयी लक्ष्य पार केले. दिपेंद्रने ५८ चेंडूत एक चौकार आणि तीन षट्कारासह नाबाद ५० धावा काढल्या.