नासा करणार सूर्यावर स्वारी

0
23

प्रसिद्ध अंतराळ संशोधन संस्था नासानं सूर्यावर स्वारी करण्याचं ठरवलं आहे. पाच ऑगस्टला नासाचं एक सौरयान सूर्याच्या दिशेने झेपावणार आहे. हे यान छोट्या कारच्या आकाराचे आहे. सूर्याचा करोना हा त्याच्या पृष्ठभागापेक्षा अधिक उष्ण का, यासारख्या अनेक महत्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न हे यान करणार आहे.

सूर्याच्या करोनामधून सौर वादळाची उत्पत्ती होते. त्यामुळे या मिशनला अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक मिशन मानलं जातं आहे.

हे यान दुसऱ्या यानांच्या तुलनेत सूर्याच्या सातपट अधिक जवळ जाणार आहे. इजीन पार्कर या ९० वर्षीय खगोलशास्त्रज्ञाने सौर वादळांसंदर्भात सर्वप्रथम अंदाज वर्तवला होता. त्यांच्या सन्मानार्थ या यानाला पार्कर सोलर प्रोब असे नाव देण्यात आलं आहे. नासा आणि जर्मनीची अंतराळ संशोधन संस्था यांनी संयुक्तरित्या १९७६ साली हेलिअस-२ नावाचं यान पाठवलं होतं.