नारायण राणे यांची नव्या राजकीय पक्षाची स्थापना

0
29

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ राजकीय नेते नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) त्यांच्या पुढील वाटचालीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंच्या नव्या पक्षाचे नाव “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे आहे.

कॉंग्रेसमधून बाहेर पडलेले ज्येष्ठ राजकीय नेते नारायण राणे यांनी रविवारी (ता. १) त्यांच्या पुढील वाटचालीविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली. राणेंच्या नव्या पक्षाचे नाव “महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे आहे.महाष्ट्रातील सर्व जनतेचा गतिमान पद्धतीने विकास करण्यासाठी या राजकीय पक्षाची बांधिलकी राहिल. राज्याचा विकास साध्य करण्यासाठी पक्ष आवश्‍यक ते सर्व प्रयत्न करेल,” असे राणे म्हणाले.

नारायण राणे – राजकीय कारकीर्द 

१ फेब्रुवारी, इ.स. १९९९ ते १७ ऑक्टोबर, इ.स. १९९९ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते जुलै इ.स. २००५ पर्यंत शिवसेना या राजकीय पक्षाचे सदस्य होते, त्यानंतर ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षात गेले.

इ.स. १९९६ : शिवसेना भाजप सरकारमधील महाराष्ट्राचे महसूलमंत्री झाले.

इ.स. १९९९ : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले.

इ.स. २००५ : शिवसेनेतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

इ.स. २००८ : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवला गेला.

इ.स. २००८ : प्रहार (वृत्तपत्र) सुरू केले.

इ.स. २००९ : पक्षाच्या विरोधात जाहीर विधाने केल्याने निलंबनाची कारवाई झाली. पक्षश्रेष्ठींची माफी                  मागीतल्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेतली.

इ.स. २००९ : महाराष्ट्राचे महसूलमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.