नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्पासाठी सामंजस्य कराराला मंजुरी

0
20

जगातील महाप्रकल्पापैकी एक म्हणून भविष्यात गणल्या जाणाऱ्या [रत्नागिरी महातेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स संकुल प्रकल्प’ च्या समझोता करारावर आज सौदी अरेबियाच्या सौदी आरामको आणि भारतातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपनी समुहादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या.

# जगातील महाप्रकल्पापैकी एक म्हणून भविष्यात गणल्या जाणाऱ्या [रत्नागिरी महातेल शुद्धीकरण व पेट्रोकेमिकल्स संकुल प्रकल्प’ च्या समझोता करारावर सौदी अरेबियाच्या सौदी आरामको आणि भारतातील इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल कंपनी समुहादरम्यान स्वाक्षऱ्या झाल्या.

# या संभाव्य प्रकलची तेलशुद्धीकरणाची क्षमता दररोज 12 लाख पिंप असेल. या प्रकल्पामुळे विकासाबरोबर रोजनिर्मितीला चालण्या मिळण्याची अपेक्षा आहे.

# भारताच्या वाढत्या इंधन मागणीची पूर्तता करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प साहाय्यभूत ठरणार आहे. रत्नागिरी मेगा रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लि, हे या नाव असून  भारत व सौदी अरेबियाच्या संयुक्त प्रयत्नातून तो उभारण्यात येईल.

# प्रकल्पासाठीचा अंदाजे खर्च  लाख कोटी म्हणजेच 44 अब्ज डॉलर्स इतका असेल. भारतीय तेल कंपनी समूह आणि [सौदी आरामको] हे या प्रकल्पातील निम्मे निम्मे म्हणजे प्रत्येकी 50 टक्के भागीदार असतील.

# आता दोन्ही बाजूकडून प्रकल्पाच्या प्रत्यक्ष आकृतिबांधावर वाटाघाटी सुरु करण्यात आल्या आहेत. या प्रकल्पात वर्षाला 6 कोटी टन तेलशुद्धीकरण केले जाईल.

# या प्रकल्पातून पेट्रोलियमची विविध प्रकारची व दर्जाची उत्पादने तयार केली जातील. [बीएस-6] या इंधन शुद्धतेच्या मापदंडानुसार येथून पेट्रोलची डिझेलची निर्मिती केली जाईल.

# हा एकात्मिक पेट्रोकेमिकल्स प्रकल्प म्हणून विकसित केला जाणार आहे. सुमारे पावणेदोन कोटी उत्पादने येथे वर्षाला तयार केली जाणार आहेत.

# केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेश प्रधान व सौदी आरामको कंपनीचे सीईओ अमीन एच नासीर यांच्या उपस्थितीत समझोता करारावर सह्या करण्यात आल्या.