नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारणार परेश रावल

0
17

आपल्या एकापेक्षा एक वेगळ्या भूमिकांसाठी अभिनेता परेश रावल हे ओळखले जातात. ते आगामी संजू चित्रपटातही सुनील दत्त यांच्या भूमिकेत दिसणार असून त्यानंतर परेश रावल आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये मोदी यांची भूमिका साकारताना दिसणार आहे.

याबाबत काही माध्यमातून आलेल्या वृत्तांनुसार, या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार होत असून सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरु असे परेश रावल यांनीच सांगितले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारणे खूप चॅलेंजिंग असणार असे देखील परेश रावल यांनी सांगितले आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका कोण करणार याकडे गेल्या काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागले होते. परेश रावल यांचे नाव अखेर फायनल झाले आहे. तसेच परेश रावल या चित्रपटाची निर्मितीही करणार असल्याचे म्हटले जात आहे.