नदालचे आठवे जेतेपद

0
14

स्पेनच्या रफाएल नदालने इटालीयन ओपन (रोम मास्टर्स) टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत गतविजेत्या अलेक्झांडर झ्वेरेववर ६-१, १-६, ६-३ अशी मात करून विजेतेपद मिळवले. नदालने ही स्पर्धा आठव्यांदा जिंकली. या विजयाने नदालने अव्वल स्थान पुन्हा मिळवले आहे.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या झ्वेरेववर नदालचा हा पाचवा विजय ठरला. अद्याप झ्वेरेवला नदालवर विजय मिळवता आलेला नाही. या स्पर्धेत १-१ अशा बरोबरीनंतर जर्मनीचा झ्वेरेव ३-१ने आघाडीवर होता. यानंतर दोन वेळा पावसामुळे खेळ थांबवावा लागला. यानंतर अग्रमानांकित नदालने जोरदार पुनरागमन करून विजेतेपद निश्चित केले. नदालहा ३२वा मास्टर्स किताब ठरला.