द. आशियाई शरिरसौष्टव संघटनेच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे प्रशांत आपटे

0
140

देशातील सर्वात बलाढ्य राज्य संघटना म्हणून नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेची ताकद आता आणखी वाढली आहे. राज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली अनेका राष्ट्रीय स्तरीय स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर मार्च महिन्यात भारत श्रीचे अभूतपूर्व आयोजन आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या आशिया श्री या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे भव्य-दिव्य आयोजन करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या राज्य संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांच्यावर आता दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव संघटनेच्या अध्यक्षपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या शरीरसौष्ठव संघटनेने गेल्या चार वर्षात तीन राष्ट्रीय स्पर्धाजागतिक स्पर्धा तसेच अनेक देशपातळीवरच्या स्पर्धांचे भव्यदिव्य आयोजन करून राज्याने आपली ताकद अवघ्या देशाला दाखवून दिली आहे. एवढेच नव्हे तर नुकतीच पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारीही राज्याने दिमाखदारपणे पार पाडलीय.  प्रशांत आपटे यांच्यासारख्या कार्यसम्राट संघटकामुळे राज्याची संघटना आणखी बलशाली झाली आहे आणि आता दक्षिण आशियाई संघटनाही ते त्याच जोशाने सक्षम करतील, अशा शुभेच्छा भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे यांनीही आपटे यांना दिल्या.