देशात पायाभूत प्रकल्प उभारणीत महाराष्ट्र देशात प्रथम

0
20

महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. गेल्या 4 वर्षात राज्यात 284 पायाभूत प्रकल्प मंजूर झाले आहेत. या प्रकल्पाची एकूण किंमत 1लाख 43 हजार 736 कोटी इतकी आहे.

# या पायाभूत सुविधा प्रकल्पामध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प व शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश आहे. यामध्ये 5 ते 50 कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत प्रकल्पाचा समावेश आहे.

# केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाने देशातील पायाभूत सुविधा प्रकल्पांची 31 मार्च 2018 अखेर पर्यंतची माहिती जाहीर केली आहे.

# केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाने सन 1990 पासूनच्या देशातील पायाभूत प्रकल्पांची माहिती संकेतस्थळानुसार प्रसिद्ध केली आहे.

# गेल्या 28 वर्षात देशात 54 लाख 65 हजार कोटी किमतीचे 9068 पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आले. या तुलनेत महाराष्ट्रात 6 लाख 19 हजार कोटीचे 1144 पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे हातात घेण्यात आली आहे.

# महाराष्ट्र पायाभूत सुविधा निर्माण करण्यात अव्वल ठरले असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. या राज्यात ३ लाख ४३ हजार कोटींचे ५४४ प्रकल्प हाती घेण्यात आले.

# गोवा हे राज्य पायाभूत सुविधा निर्माण करण्यात तिसऱ्या स्थानावर आहे. या राज्यात 3 लाख 25 हजार कोटी किमतीचे 46 प्रकल्प हाती घेण्यात आले.अरुणाचल प्रदेश चौथ्या स्थानावर तर आंध्रप्रदेश क्रमवारीत 5 व्या स्थानावर आहे.

# राज्यात गेल्या 4 वर्षात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा प्रकल्पाची कामे हाती घेण्यात आली आहेत. सन 2014 ते 2018 या 4 वर्षात 1 लाख 43 लाख 43 हजार 736 कोटी किमतीचे 284 प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.